________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuni Cyanmandir
सोमसेनकृत वैवर्णिकाचार, अध्याय आठवा. पान ४१७.
॥ श्रीवीतरागाय नमः ।। ॥ अष्टमोऽध्यायः॥
मंगल. हरिवंशोदयपर्वतसूर्योऽजेयप्रतापपरिभाब्यः॥
जयति सदरिष्टनेमिस्त्रिभुवनराजीवकाल्हादी ॥१॥ अर्थ--हरिवंशरूपी जो उदयपर्वत त्यावरील मूर्यच की काय! असा आणि अजिंक्य अशा प्रतापामुळे चिंतनीय असा आणि त्रिभुवनरूपी कमलाला आनंदित करणारा असा जो सत्गुरूप अरिष्टनेमि तो, उत्कर्ष पावत आहे.
चन्द्रप्रभं जिनं वन्दे चन्द्राभं चन्द्रलाञ्च्छनम् ॥
भव्यकुमुदिनीचन्द्र लोकालोकविकाशकम् ॥२॥ अर्थ-चंद्राप्रमाणे ज्याची कांति आहे, चंद्र हेच ज्याचे चिन्ह आहे, जो भव्यजीवरूपी कमलिनीला उल्लसित करीत आहे आणि लोकालोकात्मक अशा संपूर्ण विश्वाचें जो प्रकाशन करीत आहे अशा चंद्रप्रभजिनेंद्राला मी नमस्कार करतो.
BARABABUA
For Private And Personal Use Only