________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuni Cyanmandir
सोमसेनकृत वर्णिकाचार. अध्याय सातवा. पान ४१३.
बहिर्देशात्समायातः स्नात्वाऽऽचम्य विशेदगृहम ॥ १७१ ॥ अर्थ-दोघे पूज्य गृहस्थ उभे राहिले असता त्यांच्या मधून आपण जाऊ नये. कारणावांचून कोणाला काही विचारूं नये. बाहेरून आले असतां स्नान आणि आचमन करून नंतर घरांत जावें.
कोणत्याही कृत्याच्या आरंभीचें मंगल. आरम्भे तु पुराणस्यान्यव्यापारस्य कस्यचित् ।।
नमः सिद्धेभ्य इत्युच्चैनम्रीभूतो वदेवचः ॥ १७२ ।। ९ अर्थ- पुराण वाचण्यास प्रारंभ करण्याच्या पूर्वी, किंवा दुसरे कोणतेही कृत्य आरंभ करण्याच्या पूर्वी नम्र होऊन “ नमः सिद्धेभ्यः " असे उच्चारावें.
ऐहिकपारलौकिक दृष्टि. भुञ्जानोऽप्यहिक सौख्यं परलोकं विचिन्तयेत् ॥
स्तनमेकं पिवन्यालोऽन्यस्तनं मर्दयेद्भुवि ॥ १७३ ॥ 2 अर्थ- ह्या लोकींचे सुख भोगीत असतांही मनुष्याने पारलौकिक सुखाचा अवश्य विचार केला, पाहिजे. लहान मूल देखील आईच्या एका स्तनाचे पान करीत असतांही दुसरा स्तन हाताने धरीत असते; हे आपण पहात नाही काय?
RAN
For Private And Personal Use Only