________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सोमसेनकृत वैवर्णिकाचार, अध्याय सातवा. पान ४१२.
छात्रागारे नृपागारे शत्रुवेश्यागृहे तथा ॥
कीतान्नसदने नीचार्चकागारे न भुञ्जयेत ॥ १६८ ॥ अर्थ-शिष्य, राजा, शत्रु, वेश्या ह्यांच्या घरांत आणि जेथें अन्नविक्रय करतात त्या घरांत (खाणा-१ ९वळीत ) भोजन करूं नये. तसेंच नीच मनुष्याच्या आणि पूजकाच्या घरांतही भोजन करूं नये.
विश्वास न ठेवण्याच्या वस्तु.. नविनां च नदीनां च सृङ्गिणां शस्त्रपाणिनाम् ॥ वनितानां नृपाणां च चोराणां व्यभिचारिणाम् ॥ १६९ ॥ खलानां निन्दकानां च लोभिना मद्यपायिनाम् ॥
विश्वासो नैव कर्तव्यो वञ्चकानां च पापिनाम् ॥ १७० ।। अर्थ- नखांनी प्रहार करणारी जनावरें, नद्या, शिंगांनी मारणारी जनावरें, शस्त्र हातांत असलेले लोक, स्त्रिया, राजे, चोर, व्यभिचार करणारे लोक, दुष्ट लोक, निंदा करणारे लोक, लोभी, मद्यप, दुसऱ्यास फसविणारे (भामटे) आणि पातकी ह्यांच्यावर केव्हाही विश्वास ठेवू नये.
इतर व्यवहार करून बाहेरून घरांत येणे. मध्ये न पूज्ययागच्छन्न पृच्छेदप्रयोजनम् ।।
For Private And Personal Use Only