________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
सोमसेनकृत त्रैवर्णिकाचार, अध्याय सातवा. पान ४०८.
wwwEVVVRAN
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
अर्थ- आडाच्या तोंडाजवळ, वारुळाच्या शेजारी, चोर, वेश्या आणि मद्यपी ह्यांच्या शेजारी आणि जाण्यायेण्याच्या रस्त्यावर केव्हांही निजूं नये. तसेंच तळ्याच्या कांठावर निजूं नये. नैको मार्गे व्रजेनैकः स्वपेत्क्षेत्रे शवान्तिके ॥ अविज्ञातोदके नैव प्रविशेद्वा गिरौ न हि ।। १५७ ॥
अर्थ- एकट्यानें मार्गक्रमण करूं नये. शेतांत किंवा मेताच्या जवळ एकट्यानें निजूं नये. ज्या पाण्याची आपल्याला माहिती नाहीं त्या पाण्यांत एकट्याने शिरू नये. आणि पर्वतावर चढतांना एकट्यानें चढू नये.
दातृसेवा आणि शास्त्र चिंतन.
दातारं पितृवुध्या च सेवेत क्षेमहेतवे ॥
पठितान्यपि शास्त्राणि पुनः पुनः प्रचिन्तयेत् ॥ १५८ ॥
अर्थ- आपला योगक्षेम चालण्याकरितां जो आपल्याला द्रव्य देतो, त्याची पित्याप्रमाणे सेवा करावी. एकवार पढलेल्या शास्त्राचा पुनः पुनः विचार करावा.
सूक्ष्मवस्तु तथा सूर्य नैकदृष्ट्या विलोकयेत् ॥
पादत्राणं विना मार्गे गच्छने हि सुधार्मिकः ॥ १५९ ॥
For Private And Personal Use Only