________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सोमसेनकृत वैवर्णिकाचार, अध्याय सातवा. पान ४०४.
a४00RUAGAVA
अर्थ- जो आळस टाकून सर्वदा उद्योग करतो, आणि सदाचाराने युक्त असतो, त्याला कोव्यवधि 'द्रव्य प्राप्त होते. ही गोष्ट त्यांनी लक्षात ठेवावी..
सद्व्यापार तथा धर्मे आलस्यं न हि सौख्यदम् ।।
उद्योगः शत्रुवन्मित्रमालस्यं मित्रवद्रिपुः॥१४५ ।। ___ अर्ध- सदाचार आणि धर्म ह्यांविषयी आळस केल्याने सुखप्राप्ति होत नाही. उद्योग हा शत्रूप्रमाणे, भासणारा असा मित्र आहे. आणि आळस हा मित्राप्रमाणे भासणारा शत्रु आहे.
जिनस्मरणाचे विशेष प्रसंग. पीडायामद्भुते जम्भे स्वेष्टार्थप्रक्रमे क्षुते॥
शयनोत्थानयोः पादस्खलने संस्मरोजिनम् ॥ १४६ ॥ ____ अर्थ----- कांहीतरी पीडा उत्पन्न झाली असतां, आपल्या इष्ट कार्याला आरंभ करण्याच्या वेळी,, शिंक आली असतां, निजणे आणि उठणे ह्या वेळी, पाय अडखळला असतां, किंवा ठेच लागली असता, श्रीजिनेंद्राचे स्मरण करावें.
व्यवहारांत वागण्याची पद्धति. अश्रद्धेयमसत्यं च परनिन्दात्मशंसने ॥
GM2008
For Private And Personal Use Only