________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
intri.000000
सोमसेनकृत वैवर्णिकाचार, अध्याय पहिला. पान ३३. ह्या पदाला तत्त्व ह्मणावें असें औत्तरात्यांचे (उत्तरेकडील लोकांचे) मत आहे. आह्मांस कर्नाटकीयांचें। मत मान्य आहे. पुढील श्लोक पहा) प्रत्येक दलाच्या शेवटाला अनाहत मंत्र लिहावा. आणि अशा ? इह्या अष्टदल कमलाच्या भोवती 'ही' ह्या मंत्राचे वेष्टन कारावे. ह्याला मंत्रराज ह्मणतात. अशा ह्या मंत्राच्या आकृतीचें जो ध्यान करतो, तो मुक्तीच्या प्राप्तीमुळे भाग्यवान् होतो. आणि शत्रुरूपी गजांचा नाश करणारा सिंहच की काय? असा होतो.
उर्ध्वाधो रेफसंयुक्तं सपरं विन्दुलाञ्छितम् ॥
अनाहतयुतं तत्त्वं मन्त्ररामं प्रचक्षते ॥ ६९॥ ॥ ___ अर्थ-वर आणि खाली रेफाने ह्मणजे रकाराने युक्त असें जें हकारयुक्त तत्व ह्मणजे (हूँ हा जो वीज मंत्र ) त्याला मंत्रराज असें ह्मणतात.
कारं बिन्दुसंयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः ।।
कामदं मोक्षदं चैव ॐकाराय नमो नमः ॥ ७० ॥ ___ अर्थ-- अनुस्वाराने युक्त अशा अकाराचें (ॐ) ह्या अक्षराचे योगी (मुनि) ध्यान करतात. तो। ॐकार इच्छित विषयाची प्राप्ति करून देणारा असून मोक्षप्राप्ति करून देणारा असा आहे. त्याला आमचा नमस्कार असो.
BARABBesane
For Private And Personal Use Only