________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
सोमसेनकृत त्रैवर्णिकाचार, अध्याय तिसरा. पान १२९.
TTVAL
वृषभादिसुपितॄणां तिलमिश्रोदकैः परम् ॥ ३१ ॥ जयादिदेवतानां च तर्पणं चाक्षतोदकैः ॥
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
एवं विधाय सन्ध्यायाः कर्म सान्ध्यं समापयेत् ॥ ३२ ॥
अर्थ- मग उजव्या मांडीवर डावा हात खालीं आणि उजवा हात वर असा ठेवावा. दोनी हातांच्या गर्भात दर्भ असावेत. ह्याप्रमाणे झाल्यावर मग प्राणायामाकरितां पूर्वी जो मंत्र सांगितला आहे, तो मंत्र तीन वेळां ह्मणावा. नंतर आचमन करावें. मग दर्भ, दूर्वा आणि अक्षता ह्यांनी मिश्र अशा उदकानें जिनेंद्र वगैरे महवचें तर्पण करावें. तिल आणि उदक ह्यांच्या योगानें हृषभ वगैरे पितरांचे तर्पण करावें. आणि अक्षता व उदक ह्यांच्या योगानें जयादि देवतांचें तर्पण करावें. ह्याप्रमाणें सर्व कर्म झाल्यावर संध्याकर्माची समाप्ति करावी.
शौचान्ते रोगपीडान्ते मृतकानुगमे तथा ॥
अस्पृश्यस्पर्शने चैव आचमादिक्रियां चरेत् ॥ ३३ ॥
अर्थ- वर सांगितलेल्या आचमन व प्राणायाम ह्या क्रिया-स्नान वगैरे करून शुद्ध झाल्यावर (किंवा मलमूत्र विसर्गानंतर शुद्ध झाल्यावर ) शरीरांतील रोगाची पीडा नाहींशी झाल्यावर, प्रेताच्या मागून गेलें असतां आणि स्पर्श करण्यास अयोग्य अशा पदार्थाचा स्पर्श झाला असतां - अवश्य कराव्यात.
senereNVNAT
For Private And Personal Use Only