________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
सोमसेनकृत त्रैवर्णिकाचार, अध्याय सहावा. पान ३२०.
2N22
निषिद्धदानें.
अथ निषिद्धानि ॥ हिंसोपकरणं मूलं कन्दं मांसं सुरा मधु ॥
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
घुणितं स्वादु नष्टान्नं सूक्ष्मान्नं रात्रिभोजनम् ॥ १३७ ॥ मिथ्याशास्त्रं वैद्यकं च ज्योतिष्कं नाटकं तथा । हिंसोपदेशको ग्रन्थः कोकं कन्दर्पदीपनम् ॥ १३८ ॥ हिंसामन्त्रोपदेशश्च महासंग्रामसूचकम् ॥ न देयं नीचबुद्धिभ्यो जीवघातप्रवर्द्धकम् ।। १३९ ॥
अर्थ- दानास निषिद्ध वस्तु सांगतात- हिंसा करण्याची साधनें, रताळीं वगैरे मुळ्या, सूरण वगैरे कंद ( गड्ढे ), मांस, मद्य, मध, घुणित ( किडे झालेले पदार्थ ), गोड पदार्थ, नासलेलें अन्न, फार बारीक पदार्थाचे अन्न (अंबील वगैरे), रात्रिभोजन, मिथ्याशास्त्र, वैद्यकाचें पुस्तक, ज्योतिषाचें पुस्तक, नाटकाचें पुस्तक, हिंसेचा उपदेश ज्यांत आहे असलें पुस्तक, कोक ( १ ) कामोद्दीपक पदार्थ, हिंसेच्या मंत्राचा उपदेश. आणि मोठ्या लढाईच्या सूचक वस्तु, हे पदार्थ कोणालाही देऊ नयेत. कारण, ह्यांतील एखादी वस्तु जर एखाद्या नीच मनुष्याच्या हातीं लागली तर त्यापासून जीवघात होण्याचा संभव आहे.
For Private And Personal Use Only