________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
सोमसेनकृत तैवर्णिकाचार, अध्याय सातवा.
पान ३८३.
reveren
चार उपाय व मंत्राचे ( मसलतीचे ) भेद.
समतादर्शनं स्वस्य ददेद्दानमरिं प्रति ॥
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
भेदः शत्रोश्च सेनाया दण्डः शत्रुनिपातनम् ॥ ६९ ॥ सहायाः साधनोपायो देशकालबलाबले | विपत्तेश्च प्रतीकारः पञ्चधा मन्त्र इष्यते ॥ ७० ॥
अर्थ- समता ह्मणजे सर्वत्र समदृष्टी ठेवणें, दान ह्मणजे शत्रूला नजराणा पाठविणें, भेद ह्मणजे शत्रूच्या सैन्यांत फूट करणे, आणि दंड ह्मणजे शत्रूला मारणें हे चार उपाय होत. हे राजानें योग्य वेळीं योजिले पाहिजेत. • आपल्याला सहाय कोण आहे ? आपल्याजवळ साधन काय ? उपाय कोणता योजला पाहिजे ? देश आणि काळ हे आपल्याला अनुकूल आहेत किंवा प्रतिकूल आहेत, आणि आलेले संकट कसें घालवावें ह्या प्रत्येकाचा विचार करणें हा पांच प्रकारचा मंत्र ( मसलत ) होय.
मुकूटबद्ध राजाचे लक्षण. अष्टादशाक्षौहिणीनां स्वामी मुकुटबन्धकः ॥
क्षोणीलक्ष्म ततो वक्ष्ये जिनागमानुसारतः ॥ ७१ ॥
अर्थ -- अठरा अक्षौहिणींचा जो स्वामी तो मुकुटबद्ध राजा होय. अक्षोहिणींचें लक्षण जिनागमाला
For Private And Personal Use Only