________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
सोमसेनकृते त्रैवर्णिकाचार, अध्याय सहावा. पान ३५५.
AA MATA
पञ्च सप्ताष्ट पर्णानि दश द्वादश वाऽपि च ।
दद्यात्स्वयं च गृह्णीयादिति कैश्चिदुदाहृतम् ॥ २३३ ॥
अर्थ - पांच, सात, आठ, दहा, किंवा बारा पार्ने आपण भक्षण करावीत; आणि दुसऱ्यासही तित कींच द्यावीत, असें कित्येक आचार्यांनीं सांगितलें आहे.
तांबूल रस सेवन.
प्रथमः कुरुते व्याधिं द्वितीयः श्लेष्मकारकः ॥
तृतीयों रोगनाशाय रसस्ताम्बूलजो मतः ॥ २३४ ॥
अर्थ- - तांबुलाचा जो पहिल्यानें रस येतो तो रोगकारक आहे. दुसऱ्याने येणारा रस कफकारक आहे. आणि तिसन्या वेळी येणारा रस रोगनाशक आहे. असें सांगितले आहे.
निषिद्धतांबूल.
तर्जन्या चूर्णमादाय ताम्बूलं न तु भक्षयेत् ॥
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
मध्यमाङ्गुल्यङ्गुष्ठाभ्यां खादयेच्चूर्णलोहितम् ।। २३५ ।।
अर्थ — तर्जनीनें चुना लावून पान खाऊं नये. मधले बोट किंवा अंगठा झांनीं चुना लावून पान खावें.
तांबुलाचं त्रयोदशगुण
For Private And Personal Use Only