________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
गृहस्थ स्त्रियांचीं आहेत.
www.kobatirth.org
सोमसेन कृत त्रैवर्णिकाचार, अध्याय सातवा.
पान ३६३.
मार्जनपद्धति.
सूक्ष्मकोमलमार्जन्या पवस्त्रसमानया ॥
मार्जयेत्सदने भूमिं बाध्यन्तेऽतो न जन्तवः ॥ ६ ॥
अर्थ – रेशमाच्या वस्त्राप्रमाणें बारीक आणि मृदु अशा मार्जनीनें ( झाडणीनें ) घरांतील भूमी लोटून टाकावी. अशा प्रकारची झाडणी असली ह्मणजे सूक्ष्मजीवांना पीडा होत नाहीं.
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
धूलिक्षेप.
तत्रोत्थां धूलिमादाय छायायां प्रासुके स्थले ॥
सम्प्रसार्य क्षिपेद्यत्नात्करुणायै नितम्बिनी ॥ ७ ॥
अर्थ - घरांतील जो धुरळा निघेल तो घेऊन स्त्रियांनीं सदय मनानें सावलींत निर्जन्तुक जाग्यावर फार जपून पसरून टाकावा.
भूमि सारविणें. गोमयेन मृदा बाऽथ सद्योभूतेन वारिणा ॥ गेहिन्या लेपयेद्नेहं हस्तेनाङ्गिसुयत्नतः ॥ ८ ॥
For Private And Personal Use Only