________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सोमसेनकृत त्रैवर्णिकाचार, अध्याय सतिवा, पान ३७७. Poeteeeeeeeeeehenweeeeeeeeeeeeeeeeeeeeeeecreerones प्रजेचे कृपादृष्टीने आणि न्यायाला अनुसरून रक्षण करावें. कारण प्रजेवांचून धर्माची वृद्धी होत नाही.? राजाने दुष्टांना शिक्षा करावी, सज्जनांचे रक्षण करावें, आणि जिनेंद्र व मुनींद्र यांना नमस्कार करावा. राजा धार्मिक असला झणजे त्याला पाहून प्रजा धर्माचरण करूं लागते. कारण, जसा राजा वागेल तशीटू प्रजा वागू लागते. ह्मणून राजाने धार्मिक असावें.
राजाचे लक्षणं. सप्ताङ्गैश्च भवेद्राराजा भयाष्टकविवर्जितः॥
शक्तित्रयसमोपेतः सिद्धित्रयविराजितः ॥५४॥ १ अर्थ- सात अंगें ज्याच्या राज्याला आहेत, ज्याची आठ प्रकारची भयें नष्ट झाली आहेत, जो तीन प्रकारच्या शक्तींनी युक्त आहे. आणि ज्याला तीन प्रकारच्या सिद्धि प्राप्त झाल्या आहेत तो राजा होय. तात्पर्य, राजाच्या ठिकाणी इतके गुण असावयास पाहिजेत.
सात अंगे. अमात्यससुहृत्कोशदुर्गराष्ट्रबलानि च ॥
स्वामिना सह सप्तैव राज्याङ्गानि सुखाय वै ॥५५ ।। 2 अर्थ- प्रधान, मित्र, कोश, किल्ला, राष्ट्र, सैन्य आणि राजा ही राज्याची सांत अंगें होत. ही Powecaveareerencroaneeeeewanawteesaaneaavaasneaaaaasaareer
eNN
For Private And Personal Use Only