________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
न
सोमसेनकृत त्रैवर्णिकाचार, अध्याय सहावा. पान ३३५. Sonraona wanawaganancieraniaanse
अन्नभक्षण आणि पात्रस्पर्श. वामहस्तेन गृण्हीयाझुंजानः पात्रपार्वकम् ॥
दक्षिणेन स्वहस्तेन भुञ्जीतानं विशोध्य च ।। १७९ ।। ___ अर्थ-डाव्या हाताने भोजनपात्राची एक बाजू धरून उजव्या हाताने भोजन करावें. भाजन करितांना अन्नांत एखादें कसपट, खडा, वगैरे असल्यास काढून टाकावा.
जलपान. वामेन जलपात्रं तु धृत्वा हस्तेन दक्षिणे ।। ईषदाधारमादाय पिन्नीरं शनैः शनैः ॥ १८ ॥ आदौ पीतं हरेद्वन्हि मध्ये पीतं रसायनम् ।।
भोजनान्ते च यत्पीतं तज्जलं विषवद्भवेत् ।। १८१ ।। अर्थ- भोजनांत पाणी प्यावयाच्या प्रसंगी पाण्याचे भांडे डाव्या हाताने घेऊन त्या भांड्याच्या खाली उजवा हात आधारभूत असा लावावा. आणि थोडे थोडे पाणी प्यावे. भोजनाच्या आरंभी पाणी प्यालें। असतां पोटांतील अग्नि मंद होतो. निमें भोजन झाल्यावर पाणी प्यालें असतां ते एखाद्या रसायनाप्रमाणे चांगला उपयोग करिते. आणि भोजनाच्या शेवटी पाणी प्यालें असतां तें विषाप्रमाणे होते. . .
atsAVAVOUB
BASIServowel
HAL
For Private And Personal Use Only