________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सोमसेनकृत नैवर्णिकाचार, अध्याय सहावा. पान ३३६.
शीत उष्ण भन्नांचे गुण. अत्युष्णानं बलं हन्यादतिशीतं तु दुर्जरम् ।।
तस्मात्कवोष्णं भुञ्जीत विषमासनवर्जितः ॥ १८२ ।। __ अर्थ- अतिशय उष्ण अन्न भक्षण केले असतां तें बलाचा नाश करते.. अतिशय थंड अन्न भक्षण केले ६ असतां तें पचत नाही. ह्मणून अन्न किंचित् उष्ण असावें. आणि भोजन करतांना अवघडून बसू नये.
भोजन व जलपान ह्याविषयी विशेष नियम. तृषितस्तु न भुञ्जीत क्षुधितो न पिवेज्जलम् ॥
तृषितस्तु भवेगुल्मी क्षुधितस्तु जलोदरी ।। १८३ ॥ अर्थ- तहान लागल्या वेळी अन्न खाऊ नये. आणि भूक लागल्या वेळी पाणी पिऊ नये. कारण, जर तृषित मनुष्याने पाणी प्यावयाचे सोडून भोजन केले तर त्याला गुल्म नांवाचा रोग होतो [पोटांत गांठ होते.] आणि क्षुधित मनुष्याने अन्न भक्षण न करतां जर क्षुधेच्या शांतीकरितां नुसते जलप्राशन केले, तर त्याला जलोदर होतें.
अन्नभक्षणाचा क्रम. आदौ स्वादु स्निग्धं गुरु मध्ये लवणमाम्लमुपसेव्यम् ॥
veeneed
८८
.
Veeeeeee:
For Private And Personal Use Only