________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
सोमसेनकृत त्रैवर्णिकाचार, अध्याय सहावा.
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
पान ३४४.
NNNNNNNA
अर्थ - श्रावकानें अहिंसाव्रताच्या रक्षणाकरितां आणि श्रावकाचे मूलगुण शुद्ध होण्याकरितां चारी है प्रकारचा आहार मन, वाणी आणि काय ह्या तीहींच्या योगानें करूं नये. ह्मणजे रात्री जेवण्याचें मनांत ? आणूं नये. ' रात्री जेवणार' असें बालूं नये. आणि शरीराची त्या प्रकारची क्रिया करूं नये.
रात्रिभोजननिषेधा चेंकारण.
जलोदरादिकृद्यूकाद्यङ्गमप्रेक्ष्यजन्तुकम् ॥
प्रेताद्युच्छिष्टमुत्सृष्टमप्यश्नन्निश्यहो सुखी ॥ २०३ ॥
अर्थ — रात्रींच्या वेळीं हें अन्न जलोदर वगैरे रोग उत्पन्न करणाऱ्या उवा वगैरे जीवांनीं भरलेलें असतें. त्यांतील सूक्ष्मजीव दिसत नाहींत. तें अन्न मेलेल्या सूक्ष्मजीवांनीं उष्ठे केलेलें असतें. आणि त्यांत त्या जीवांनीं मलोत्सर्ग केलेला असतो. असे असूनही तें अन्न रात्रीं खाऊन लोक आपल्याला सुखी समजतात ! हें मोठें आश्चर्य आहे.
जल गाळणें.
मुहूर्तयुग्मोर्ध्वमगालनं वा दुर्वाससा गालनमम्बुनो वा ॥
अन्यत्र वा गालितशेषितस्य न्यासो निपातेऽस्य न तद्वतेऽच्र्यः ॥ २०४॥ अर्थ -- गाळलेले पाणी दोन मुहूर्तानंतर (च्यार घटकांनंतर) पुनः न गाळतां प्यालें असतां व्रतभंग
For Private And Personal Use Only