________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सोमसेनकृत लैवर्णिकाचार, अध्याय सहावा. पान ३४३.
Moveeneteeneeeeeeeeein
रात्री भोजन व जलपान निषेध. रात्रिजीववधापायभूयस्त्वात्सबदुत्सृजेत् ॥
रात्रौ भुक्तिं तथा युञ्ज्यान्न पानीयमगालितम् ॥ २०॥ ६ अर्थ-"तसेंच रात्रीच्या वेळी जीवहिंसा अधिक होण्याचा अवश्य संभव असल्याने रात्री भोजन करण्याचंहीं अगदी सोडून द्यावे. आणि पाण्यांत अनेक जीव असतात ह्मणून ते गाळल्यावांचून केव्हाही पिऊ नये.
प्रात:काली आणि सायंकाली भोजननिषेध. मुहर्तेऽन्त्ये तथाऽऽद्येऽन्हो वल्भाऽनस्तमिताशिनः।।
गदच्छिदेऽप्याम्रघृताधुपयोगश्च दुष्यति ।। २०१॥ ___ अर्थ-मूर्यास्त होण्याच्या पूर्वी भोजन करणाऱ्याने दिवसाच्या शेवटच्या दोन घटिकेंत आणि प्रातःकालच्या आरंभीच्या दोन घटिकेंत भोजन केले असतां दोषी होतो. इतकेच नव्हें. तर औषधाकरिता ह्मणून आंबे, तूप, वगैरे पदार्थ जरी त्यावेळी सेवन केले तथापि तो दोषी होतो.
रात्री भोजननिषेध. अहिंसावतरक्षार्थ मूलव्रतविशुद्धये ॥ नक्तं भुक्तिं चतुर्धाऽपि सदा धीरस्त्रिधा त्यजेत् ॥ २०२॥
For Private And Personal Use Only