________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
सोमसेनकृत वैवर्णिकाचार, अध्याय सहावा. पान ३३२. ANNNN CALALAL
कोविदारकदम्बानां पात्रेषु नैव भुज्यते ॥ १७२ ॥
अर्थ- आतां निषिद्ध पार्श्वे सांगतात- चिंच, रुई, पिंपळ, कुंभा किंवा गुग्गुळ, जांभळ, कांचन आणि कळंब ह्यांच्या पानांवर भोजन करूं नये.
निषिद्ध पात्रें.
करे खर्परके गेही शिलायां ताम्रभाजने ॥
भिन्नकांस्ये च वस्त्रे च न भुञ्जीयात्तथायसे ॥ १७३ ॥
अर्थ — हात, खापर, दगड, तांब्याचें भांडे, काश्याचें फुटलेले श्रावकानें भोजन करूं नये. तसेंच लोखंडाच्या पात्रांत भोजन करूं नये.
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
अन्न वाढणें
अन्नं मध्ये प्रतिष्ठाप्यं दक्षिणे घृतपायसम् ॥
शाकादि पुरतः स्थाप्यं भक्ष्यं भोज्यं च वामतः ॥ १७४ ॥
भांडे आणि वस्त्र ह्यांवर गृहस्थ
For Private And Personal Use Only
अर्थ- भात वगैरे अन्न पात्रांत मध्यभागी असावें. तूप आणि खीर उजव्या बाजूस असावें. भाज्या वगैरे पदार्थ पुढे असावेत. आणि बाकीचे खाण्याचे पदार्थ डाव्या बाजूस असावेत.