________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
सोमसेनकृत त्रैवर्णिकाचार, अध्याय सहावा.
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
NNNNes
पान ३२७. अर्थ- आतां पंक्तीस घेण्याला अयोग्य कोण कोण आहेत तें सांगतात. आपल्या जातीहून निराळ्या जातीचा मनुष्य, दुष्टमनाचा, मळकट व अंगावर घेणारा, स्नान न केलेला, ज्याचा कोणतातरी अवयव तुटलेला आहे असा, लोकांची निंदा करणारा; श्वास, खोकला, व्रण, कुष्ट, पेनसी आणि ओकारी ह्यांपैकीं कोणताही रोग ज्याला असेल तो, नेहमीं रोगी असलेला, मिध्यादृष्टि, उगीच अंग हलविणारा, उन्मत्त झालेला, नेहमी थट्टा करणारा, असंतुष्ट मनाचा, पाखंडी, अंगावर मुद्रा वगैरे चिन्हें धारण करणारा, भ्रष्ट झालेला, दुष्ट वाद करणारा, सात प्रकारच्या व्यसनांपैकी कोणतेंही एखादें व्यसन ज्याला आहे असा, दुराचार करणारा, मनांत दुष्ट भाव धरणारा, चार कषाय ज्याला आहेत असा दरिद्री, निर्दय, अभिमानी अशा मनुष्यांना पंक्तीस घेऊं नये. अगदीं लहान मूल आणि अतिशय वृद्ध मनुष्य ह्यांना पंक्तीस घेऊं नये. अतिशय काळा असलेला मनुष्य, ज्याच्या बुद्धीला भ्रम झाला आहे असा मनुष्य पंक्तीस घेऊ नये. नपुंसक, गुदद्वाराला प्रतिबंध नसलेला, पंचांनी ज्याला बहिष्कृत केले आहे असा, नेहमीं देवपूजा करून उदरनिर्वाह करणारा, निर्माल्य खाणारा, जीवांचा घात करणारा, राजद्रोह : गुरुद्रोह करणारा, पूजेला विघ्न करणारा, उगींच बडबडणारा, खोटें बोलणारा, ज्याचे अवयव वांकडे आहेत असा, आणि फारच गिड्डा असलेला, अशा मनुष्यांना पंक्तीस घेऊं नये. भोजनाचे वेळीं कुतरें, डुकर, चांडाल, म्लेच्छ आणि हिंसा करणारे ह्यांचे दर्शन करूं नये.
For Private And Personal Use Only