________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
vvvvvvee
सोमसेनकृत वर्णिकाचार, अध्याय सहावा. पान ३२९.
नन्ति ते बलमन्नस्य मण्डलेन विवर्जितम् ।। १६४ ॥ १ अर्थ- भोजनाच्या पात्राखाली जर मंडळ केले नाही तर, यातुधान, पिशाच, असुर आणि राक्षस हे। त्या अन्नांतील सत्वांश नाहीसा करवाव.
भोजनपात्रभेद. भोजने भुक्तिपात्रं तु जलपात्रं पृथक् पृथक् ॥
श्रावकाचारसंयुक्ता न भुञ्जन्त्येकभाजने ॥ १६५॥ अर्थ-जेवणाच्या वेळी भोजनपात्र आणि पाणी पिण्याचे पात्र ही प्रत्येकांची निराळी असावीत. श्रावकाचा आचार संभाळणारे लोक एका पात्रांत भोजन करीत नाहींत.
कांस्यपात्रभोजनफल. एक एव तु यो धुंक्ते विमले कांस्यभाजने ॥
चत्वारि तस्य वर्धन्ते आयुः प्रज्ञा यशो बलम् ॥ १६६ ॥ ___ अर्थ- काश्याच्या पात्रांत एकटाच जो भोजन करतो त्याची--आयुष्य, बुद्धि, यश आणि बल-ही चार दि पावतात.
For Private And Personal Use Only