________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सौमसेनकृत वर्णिकाचार, अध्याय सहावा. पान ३२१. २४.evenewerkeeeeeeeeeeeeeeeeeeeeehd०
कुपात्र. मदोन्मत्ताय दुष्टाय जैनधर्मोपहासिने । हिंसापातकयुक्ताय मदिरामांसभोजिने ॥ १४०॥ मृषापलापिने देवगुरुनिन्दां प्रकुर्वते ॥
देयं किमपि नो दानं केवलं पापवर्द्धनम् ॥ १४१ ॥ अर्थ-- मदोन्मत्त झालेले दुष्ट, जैनधर्माची थट्टा करणारे, हिंसारूपी पापकर्म करणारे, मद्यपान आणि मांसभोजन करणारे, खोटे बोलणारे, देव आणि गुरु यांची निंदा करणारे असे जे लोक असतील, त्यांना काहीही देऊ नये. कारण, अशांना दिल्याने त्यांच्या पापकर्माला उत्तेजन दिल्यासारखे होते.
मिथ्याशास्त्रेषु यत्प्रोक्तं ब्राह्मणैर्लोभलम्पटैः॥
तन्न देयमजास्त्र्यादि पादत्राणादि हिंसकम् ॥ १४२ ॥ अर्थ- लोभाने लंपट झालेल्या ब्राह्मणांनी मिथ्याशास्त्रांत जे शेळी, स्त्री, वगैरे पदार्थ द्यावयास सांगितले आहेत, ते देऊ नयेत. तसेंच पायांत घालण्याचा चामड्याचा जोडा देऊ नये. कारण, त्यामुळे हिंसा होते.
PoweresmereVASANSOM
For Private And Personal Use Only