________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सोमसेनकृत वैवर्णिकाचार, अध्याय सहावा. पान २७३. रम्ये स्निग्धां सुगन्धादिदर्वाद्याठ्यां स्वतःशुचिम् ॥
जिनजन्मादिना वाऽस्मै स्वीकुर्याद्भूमिमुत्तमाम् ॥ ८॥ अर्थ-- जिनमंदिर बांधण्याकरितां जी जागा निश्चित करावयाची त्या जाग्यावर दुर्वा वगैरे उगवलेल्या असाव्यात, ती जागा स्वाभाविकपणेच शुद्ध असावी, अथवा जिनेंद्राचे जन्मकल्याण वगैरे झाल्यामुळे ती जागा शुध्द असावी. त्या जाग्यांतील माती चिकट असावी. आणि त्या जाग्याचा वास चांगला येत ? असावा. अशी उत्तम जागा पाहूम जिनमंदिर बांधण्यास घ्यावी.
मंदिराच्या भूमीची शुभाशुभ लक्षणे पहाण्याचे साधन. खात्वा हस्तमधः पूर्णे गर्ते तेनैव पांसुना ॥
तदाधिक्यसमोनत्वैः श्रेष्ठा मध्याऽधमा च भूः॥९॥ ___ अर्थ-त्या जाग्याची परीक्षा पहाण्याकरितां त्या जागेत कोठेतरी एक हातभर खळगा काढावा आणि त्यांतील जी माती वर काढली असेल त्याच मातीने तो भरून काढावा. जर ती माती तो खळगा भरून अधीक होईल तर ती जागा उत्तम समजावी. माती शिल्लक न उरल्यास जागा मध्यम समजावी. आणि माती कमी पडल्यास जागा वाईट आहे असे समजावे.
प्रदोषे कटसंरुद्धतामस्रायां च तदभुवि ॥
For Private And Personal Use Only