________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सोमसेनकृत वर्णिकाचार, अध्याय सहावा. पान ३१३. rveeeeeaviseonecomcaenemenvaaseerwenerveereeracaomes
आहों अशी प्रसिद्धि होते. मित्राला दिले असतां प्रेम अधिक वाढते. शत्रूला दिले असतां द्वेष नाहीसा होतो. चाकर मनुष्यांना दिले असता त्यांची भक्ति आपल्यावर अधिक होते. राजाला दिले असता आपली प्रतिष्ठा होते. आणि ब्राह्मणाला दिले असतां कीर्ति होते. एकंदरीत दान हें कोठेच निष्फल होत नाही.
सुप्तोत्तानशया लिहन्ति दिवसान स्वांगुष्ठमार्यास्ततः । को रङ्गान्ति ततः पदैः कलगिरो यान्ति स्खलद्भिस्ततः।। स्थयोभिश्च ततः कलागुणभृतस्तारुण्यभोगोद्गताः।
ससाहेन ततो भवन्ति सुहगादानेऽपि योग्यास्ततः ॥ ११८ ।। अर्थ- दान करणारे जीव पुढल्या जन्मीं भोगभूमीत आर्य होऊन जन्मास येतात. त्यांची स्थिति ? अशी असते की, ते जन्मास आल्यापासून सात दिवस उत्ताणे निजून आपला हाताचा अंगठा चोखतात.१ 5. पुढे सात दिवस जमिनीवर रांगू लागतात. मग सात दिवस बोबडे बोलत अडखळत चालतात. पुढे सात दिवसांत चांगले चालतात. मग सात दिवसांत कला आणि गुण ह्यांनी पूर्ण होतात. नंतर सात दिवसांत तरुण होतात. आणि पुढे सात दिवसांत सम्यग्दर्शनाचे ग्रहण करण्यास योग्य होतात. आणि चिरकाल रहातात. तात्पर्य, दानप्रभावाने एकोणपन्नास दिवसांत ते तरुण होऊन सर्व सुखाचा अनुभव करूं लागतात.
RaveeMOONAMAeaNaveen
For Private And Personal Use Only