________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
खमह असें ह्मणतात.
www.kobatirth.org
सोमसेनकृत त्रैवर्णिकाचार, अध्याय सहावा. पान २९९.
RETETENAAs
कल्पदुममहलक्षण.
किमिच्छकेन दानेन जगदाशाः प्रपूर्य यः ॥ चक्रिभिः क्रियते सोऽर्हयज्ञः कल्पद्रुमो मतः ॥ ७८ ॥
अर्थ - चक्रवर्ती राजांनीं याचक लोक जे मागतील तें त्यांना देऊन सर्वांची इच्छा तृप्त करून जी
पूजा केली जाते त्या पूजेला कल्पद्रुममह असें ह्मणतात.
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
बलिस्नपननाव्यादि नित्यं नैमित्तिकं च यत ॥
भक्ताः कुर्वन्ति तेष्वेव तद्यथास्वं विकल्पयेत् ॥ ७९ ॥
अर्थ - बलिदान करणें, जिनेंद्रांना स्नान घालणे, त्यांच्या पुढे नृत्यगायन करणें वगैरे ज्या नित्यनैमित्तिक क्रिया भक्तिमान् श्रावक करतात, त्या सर्व क्रियाही ह्या वरील पांच प्रकारच्या पूजेत यथाविधि कराव्यात.
जलधारा वगैरेंचीं फलें.
वार्धारा रजसः शमाय पदयोः सम्यक्प्रयुक्ताऽर्हतः । सद्गन्धस्तनुसौरभाय विभवाच्छेदाय सन्त्यक्षताः ॥
For Private And Personal Use Only