________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सोमसेनकृत त्रैवर्णिकाचार, अध्याय सहावा. पान ३०८.
NNNNNNNNN
१०४ ॥
धर्मभोगयशः सेवापात्रभेदात् परं मतम् ॥ अर्थ — दान देण्यास योग्य अशा मनुष्यास पात्र असें ह्मणतात. हे पात्र धर्मपात्र, भोगपाल, यशःपात्र आणि सेवापात्र असें चार प्रकारचें आहे. हीं चार प्रकारची पात्रें आपल्यास ह्या लोकीं आणि परलोकीं सुखप्राप्ति करून देणारी आहेत.
धर्मपात्राचे भेद.
धर्मपात्रं त्रिभेदं स्यात् जघन्यं मध्यमोत्तमम् ॥
तेभ्यो दानं सदा देयं परलोकसुखप्रदम् ॥ १०५ ॥
अर्थ -- धर्मपात्र हैं कनिष्ठ मध्यम आणि उत्तम असें तीन प्रकारचें आहे. त्याला सर्वदा दान द्यावें. त्यापासून परलोकीं सुखप्राप्ति होते.
जघन्यपात्राचें लक्षण.
सम्यग्दृष्टिः सदाचारी श्रावकाचारतत्परः ॥
गुरुभक्तश्च निर्गर्वो जघन्यं पात्रमुच्यते ॥ १०६ ॥
अर्थ- जो सम्यग्दर्शन, सदाचार, श्रावकांचा आचार आणि गुरुभक्ति ह्यांनी युक्त असतो आणि गर्वरहित असतो, तो दान देण्यास कनिष्ठ पात्र होय.
22x
For Private And Personal Use Only