________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सोमसेनकृत बैवर्णिकाचार, अध्याय सहावा. पान ३०६. Preverentoosenevaa.nawiverseavenews । अर्थ- दुसरे आपले सधर्मिलोक जर असतील तर त्यांच्या पुढे आपण स्वतः धर्माची प्रभावना करण्या-१ करितां सावधान अंतःकरणाने शास्त्र सांगावें. त्यांत जीव, अजीव, आस्रव, बंध, संवर, निर्जरा आणि । मोक्ष ही जिनागमांत सांगितलेली सात तखें; जीव, अजीव , आकाश, धर्म, अधर्म आणि काल ही सहा द्रव्ये; जीव, अजीव, आकाश धर्म आणि अधर्म हे पांच अस्तिकाय; यतींचे धर्म आणि श्रावकांचे धर्म । ६ इतक्यांचे विवेचन करावे. हे विवेचन करतांना मिथ्यामतांचे खंडण करून प्रमाण आणि नय ह्यांच्या १योगाने अनेकांतमताचें ( स्याद्वादाचें) स्पष्टीकरण करावे. पुण्य आणि पाप ह्यांची शुभ आणि अशुभ
अशी फलें सांगून, दयादान पुण्यकारक आहे , व हिंसा, असत्य, वगैरे आचार हा पापकारक आहे वगैरे गोष्टींचें। धर्मशास्त्राला अनुसरून सविस्तर विवेचन करावें. अशा प्रकारे व्याख्यान करून यति आणि पंडित यांना, शास्त्र श्रवण करण्याची इच्छा उत्पन्न करावी.
नमस्कारं पुनः कुर्याजिनानां जैनधर्मिणाम् ॥
गुर्वादिकं च सम्पृच्छय ब्रजेन्निजगृहं गृही॥१०॥ अर्थ-जिन आणि जैनधर्मी असे आपले गुरु वगैरे ह्यांना पुनः नमस्कार करून श्रावकानें मंदिरांतून आपल्या घरी यावे.
मध्यान्दविधि.
CAVA
Vee
A
.
For Private And Personal Use Only