________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
सोमसेनकृत वणिकाचार, अध्याय सहावा.
ww
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
पान २८६.
अर्थ- ज्या जिनमंदिरांत -- फुलांनीं दाट भरलेल्या अशा अनेक याला, मोठमोठे धूपांचे कलश 3 [ शेगड्या ], चवन्या हातांत घेतलेल्या अनेक तरुणी स्त्रिया, नृत्यगायन करणारी नर्तकी [ नाचणारी ] 'सुवर्ण कलशानें युक्त अशा उंच ध्वजांनी युक्त असलेले गोपुर, देव, मनुष्य, पशु आणि सिंह ह्या सर्व वस्तु नेहमी रहात आहेत, ह्मणजे ह्या सर्व वस्तु जेथें सर्वदा दृष्ट पडत आहेत.
श्रीमत्पचित्रमकलङ्कमनन्तकल्पं । स्वायम्भुवं सकलमंगलमादितीर्थम् ॥
नित्योत्सवं मणिमयं निलयं जिनानां । त्रैलोक्यभूषणमहं शरणं प्रपद्ये ॥ ४७ ॥
अर्थ- हें श्रीजिनांचे मंदिर फारच सुशोभित आहे. हे पवित्र आणि निष्पाप असून अनंतकालाचे आणि स्वयंभू असे आहे. तसेंच दर्शन करणाऱ्याचे सर्वप्रकारचें कल्याण करणारें आहे, व आमचें हें मुख्य तीर्थ आहे. हैं रत्नमय असल्यानें संपूर्ण त्रैलोक्याचें भूषणभूत आहे. ह्यांत नेहमी अनेक प्रकारचे उत्सव चालले असतात. अशा ह्या जिनमंदिरांत मी शरण प्राप्त झालों आहे.
जयति सुरनरेन्द्र श्रीसुधानिर्झरिण्याः । कुलधरणिधरोऽयं जैनचैत्याभिरामः ॥ प्रविपुल फलधर्मानोकहाग्रप्रवाल- । प्रसरशिखर शुम्भत्केतनः श्रीनिकेतः ॥ ४८ ॥ अर्थ- स्वर्गवासी देव आणि पृथ्वीवरील भूपति ह्यांची संपत्तिरूपी जी अमृताची नदी तिच्या उगमाचा कुलपर्वतच कीं काय ! असें हें श्रीजिनांच्या सुंदर प्रतिमेमुळे मनोहर दिसणारें, आणि ज्याच्यावर उभे
AAA28 HEALT
ALT८४
For Private And Personal Use Only