________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
MANALONALAMAUta
सोमसेनकृत वैवर्णिकाचार, अध्याय सहावा. पान २९०. overeoccceeeeeeeeeeeeee ४ अर्थ- आज श्रीजिनाचे मंदिर मी पाहिल्यामुळे मला असे वाटते की, मी आज संसारतापाचा नाश १ करणाऱ्या रसायनाचें घर पाहिले. मोठमोठ्या निधींचे वसतिस्थान पाहिले. सिद्धिरसाचे मंदिर पाहिले.
चिंतामणीचे उत्पत्तिस्थान पाहिले. आणखी असे वाटते की, जे मुख्य नव्हें असें फल देणाऱ्या अशा ह्या रसायन ६ वगैरे वस्तु पाहून तरी काय उपयोग आहे ? कांही नाही. ह्मणून मी जे पाहिले आहे ते ह्या सर्वांपेक्षा फारच महत्वाचे आहे. ते हे की, मी आज श्रीजिनमंदिर पाहिल्याने मुक्तिलक्ष्मीचें विवाहमंगल पाहिले.
दृष्टे त्वयि प्रभुतया प्रविराजमाने । नेत्रे इतः सफलतां जगतामधीश ।।
चित्तं प्रसन्नमभवन्मम शुद्धबुद्धं । तस्मात्त्वदीयमघहारि च दर्शनं स्तात् ।। ५६॥ । ___अर्थ-हे त्रैलोक्याधिपते ! प्रभुत्वाने सिंहासनावर विराजमान असलेल्या तुझें दर्शन झाल्याने माझे डोळे सफल झाले. आणि अंतःकरण शुद्ध व ज्ञानी होऊन प्रसन्न झाले. ह्मणून माझ्या सर्व पातकांचा नाश करणारे तुझें दर्शन मला सर्वदा होवो.
सैषा घटी स दिवसः स च मास एव । प्रातस्तथापि वरपक्ष इहास्तु सोऽपि॥
यत्र त्वदीयचरणाम्बुजदर्शनं स्या- । त्साफल्यमेव वदतीह मुखारविन्दम् ।।५७॥ 2 अर्थ- हे भगवन् ! ज्या वेळी तुझ्या चरणकमलांचे दर्शन होईल तीच घटका, तोच दिवस, तोच महिना
ताच प्रातःकाल आणि तोच पंधरवडा मला ह्या जगांत सर्वदा असो! कारण तुझें मुखकमल मला माझ्या मर
B.NPUNANAVBaanMME
teem
For Private And Personal Use Only