________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सोमसेनकृत देवनिकायार, अध्याय सहावा. ere verore RNRNANAAN WA
पान २८२.
कारची संपत्ति, पुत्र आणि अंतःकरणास वा शांति हीं फलें माप्त होतात. यामाधीची फळे सांगि तली. जिनविंदांत कोणतेच दोष असू नयेत. कारण दोष असल्याने यजमानाचे ( त्या बिंबाची प्रतिष्ठा ( करणाराचे) कल्याण होत नाहीं. जर बिंब उग्र आकृतीचे होईल तर यजमानाचा नाश होतो. विंदाचे शरीर कृश झाले असतां यजमानाचा धनक्षय होतो. बिंवाचें शरीर आंखूड झालें असतां यजमानाचा कुलक्षय होतो. चपटें अंग झाले असतां यजमानास दुःख प्राप्त होतें. विंव नेत्ररहित असल्यास नाश होतो. लहान तोंडाचे विंव असल्यास सुखोपभोग नाहीसे होतात. विवाचें उदर मोठे झाल्यास यजमानास उदर नांवाचा रोग होतो. बिंब छातींत रोडके झाल्यास यजमानास हृद्रोग होतो. विवाचा एखादा अवयव जर कमी झाला तर यजमानाचा पुत्र मरतो. चिंत्राच्या मांड्या वारीक झाल्या असतां राजाचा नाश होतो. बिंबाला पाय नसल्यास लोक मरतात. कंबर नसल्यास वाहनाचा नाश होतो. याप्रमाणें हीं सर्व फलें मनांत आणून जें चिंत्र निर्दोष असेल त्याचीच प्रतिष्ठा व पूजा करावी. प्रतिष्ठां च यथाशक्ति कुर्याद्गुरूपदेशतः ॥
स्थिरं चातुचलं बिम्बं स्थापयित्वाऽत्र पूजयेत् ।। ३९ ।।
अर्थ -- उपाध्यायाच्या सांगण्याप्रमाणे त्या बिंबाची स्थिर प्रतिष्ठा अथवा चलप्रतिष्ठा आपल्या शक्तीप्रमाणे करून त्याची पूजा करावी.
A৬ए
For Private And Personal Use Only