________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
सोमसेनकृत वैवर्णिकाचार, अध्याय चवथा.
पान २०२. Reveren
22
अर्थ - पूजादिविधि करणारा मुख्य जो असेल तो यजमान होय. जर कांहीं तशाच अपरिहार्य अडचणीमुळे तो यजमान तें कृत्य करण्याला समर्थ नसेल, तर त्याच्याकरितां त्याची पत्नी, पुत्र, कन्या, ऋत्विक्, शिष्य, गुरु, बंधु, बहिणीचा मुलगा, जांवई ह्यांपैकी कोणीतरी करावें. ह्यांनीं आपल्याकरितां जें हवन वगैरे केलें असेल तें आपण ह्मणजे मुख्यकर्त्यानेंच केल्याप्रमाणें होतें.
होमाचा काल.
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
भानौ समुदिते विप्रो जुहुयादवनं तथा ॥ अनुदिते तथा प्रातर्गवां च मोचनेऽपि वा ॥ ८१ ॥ हस्तादूर्ध्वं रविर्यावद्भुवं हित्वा न गच्छति ॥
तावदेव हि कालोऽयं प्रातस्तूदितहोमिनाम् ॥ ८२ ॥
अर्थ- होमाचा काल सांगतात- सूर्य उदय पावल्यावर ब्राह्मणाने हवन करावें. किंवा सूर्योदयाच्या पूर्वी होम करावा. अथवा गायी रानांत सोडण्याच्या वेळीं होम करावा. जे सूर्य उदय पावल्यावर होम करणारे आहेत त्यांचा काल, प्रातःकालीं सूर्य उदय पावून भूमीपासून एक हात जोपर्यंत वर आला नाहीं, तोंपर्यंतच असतो.
प्रातर्द्वादश नाड्यस्तु सायं तु नव नाडिकाः ।।
reviverrierenererereses
For Private And Personal Use Only