________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
सोमसेनकृत त्रैवर्णिकाचार, अध्याय पांचवा पान २६४.
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
पूर्णाहुतिं विदध्महे ॥ इति पूर्णाहुतिः ॥
अर्थ -- नंतर 'ॐ तिथिदेवाः' इत्यादि मंत्रानें पूर्णाहुति द्यावी. पूर्णाहुतींत फल आणि पूजेचीं द्रव्ये असावीत. आणि पूर्णाहुतीचा मंत्र संपेपर्यंत अग्नींत तुपाची धार सारखी सोडावी.
ततो मुकुलितकरः । ॐ दर्पणोयोतज्ञानप्रज्वालित सर्वलोकप्रकाशक भगवन्नन् श्रद्धां मेघां प्रज्ञां बुद्धिं श्रियं बलं आयुष्यं तेजः आरोग्यं सर्वशान्ति विधेहि स्वाहा || एतत्पठित्वा सम्प्रार्थ्य शान्तिधारां निपात्य पुष्पाञ्जलिं प्रक्षिप्य चैत्यादिभक्तित्रयं चतुर्विंशतिस्तवनं वा पठित्वा पञ्चाङ्गं प्राणम्य तद्दिव्यभस्म समादाय ललाटादौ स्वयं धृत्वा अन्यानपि दद्यात् ॥
अर्थ - नंतर हात जोडून “ ॐ दर्पणोद्योतज्ञान" इत्यादि ह्मणून श्रीजिनेंद्राची प्रार्थना करावी. त्याचा अर्थ असा आहे की, दर्पणाप्रमाणें प्रकाशमान होणाऱ्या केवलज्ञानानें दैदीप्यमान दिसणान्या आणि संपूर्ण विश्वाचे प्रकाशन करणाऱ्या हे भगवन् जिनेंद्रा ! तू आह्माला श्रद्धा, मेधा ( धारणशक्ति ) प्रज्ञा (निश्चयात्मकज्ञान ), बुद्धि ( ग्रहणशक्ति), संपत्ति, भोग्यपदार्थ, आयुष्य, तेज आणि आरोग्य दे ! आणि सर्वप्रकारची शांति कर !! अशी प्रार्थना करावी. नंतर शांतिधारा सोडून जिनेंद्राच्या चरणावर पुष्पांजलि द्यावी. चैत्यादि तीन भक्ति किंवा चतुर्विंशति तीर्थंकरस्तव ह्यांचे पठण करून पंचांगनमस्कार करावा.
For Private And Personal Use Only