________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सीमसेनकृत वैवर्णिकाचार, अध्याय सहावा. पान २७०. seeeeeeeeeece
meroeaereeeee ॥ श्रीवीतरागाय नमः ॥ षष्ठोऽध्यायः
अनन्तमहिमोपेतमनन्तगुणसागरम् ॥
अनन्तसुखसम्पन्नमनन्तं प्रणमाम्यहम् ॥१॥ १ अर्थ-मर्यादातीत अशा सामर्थ्याने युक्त असलेला आणि अनंत गुणांचा समुद्रच की काय! असा आणि अनंतसुखाने युक्त असलेला जो अनंततीर्थकर त्याला मी नमस्कार करतो.
॥अथ चैत्यालयलक्षणम् ॥ अर्थ- आतां श्रीजिनाची प्रतिमा (प्रतिबिंब किंवा मूर्ति ) स्थापन करण्याकरितां जें मंदिर बांधावयाचे, त्याचे लक्षण सांगतात
शकुनं श्रीगुरुं पृथ्वा जप्त्वा कर्णपिशाचिनीम् ॥
नदुपदेशतः कुर्याजिनागारं मनोहरम् ॥ २॥ है अर्थ- आपल्या गुरूला शकुन विचारून तो सांगेल त्या दिवशी कर्णपिशाचिनीच्या प्रसन्नतेकरितां कर्णपि-2 शाचिनीमंत्राचा जप करावा. नंतर ती देवता ज्याप्रमाणे सांगेल त्याप्रमाणे सुशोभित असें जिनमंदिर बांधावें.
For Private And Personal Use Only