________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सोमसेनकृत त्रैवर्णिकाचार, अध्याय चवथा
पान २११.
3
कुबेरपूजनाने लक्ष्मीर्वसति शाश्वती ॥ धरेन्द्रपूजनात्पुत्रप्रातिर्भवति चोत्तमा ॥ २०९ ॥
अर्थ- कुबेराच्या पूजनानें घरांत निरंतर लक्ष्मी वास करते. आणि धरणेंद्राच्या पूजनानें उत्तमपुत्राची प्राप्ति होते. श्रीदेवी पूजनाद्गर्भास्थितो बालो न नश्यति ॥
वस्त्रैर्भूषैः फलैचान्नैः सम्पूज्या वेश्मदेवताः ॥ २९० ॥
अर्थ - श्रीदेवीच्या पूजनानें गर्भामध्ये असलेले मूल नाश पावत नाहीं. ह्मणून वस्त्र, भूषणें, फलें आणि अनेक प्रकारची पकाने ह्यांच्या योगानें ह्या गृहदेवतांचे पूजन करावें.
ज्वालिनी रोहिणी चक्रेश्वरी पद्मावती तथा ॥
कूष्माण्डिनी महाकाली कालिका च सरस्वती ।। २११ ।। गौरी सिध्दायनी चण्डी दुर्गा च कुलदेवताः ॥
पूजनीयाः परं भक्त्या नित्यं कल्याणमीप्सुभिः ।। २१२ ।।
अर्थ – ज्वालिनी, रोहिणी, चक्रेश्वरी, पद्मावती, कूष्मांडिनी, महाकाली, कालिका, सरस्वती, सिध्दायनी चंडी आणि दुर्गा ह्या कुलदेवता होत. आपले कल्याण व्हावे अशी इच्छा करणाऱ्या मनुष्यानें ह्यांचें पूजन भक्तीनें नित्य उत्कृष्ट रीतीनें करावें..
For Private And Personal Use Only