________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
सोमसेनकृत त्रैवर्णिकाचार, अध्याय चवथा. पान १९४.
vareren Dene
अर्थ — आणि जर एकच कुंड असेल, तर त्या चतुष्कोण कुंडांत गार्हपत्याग्नींतच सर्व आहुती निरनिराळ्या एकशे आठ वेळां द्याव्यात.
अन्नं समिल्लवङ्गापोऽञ्जलिचतुर्विधेषु च ॥
होमेषु यत्नतः कुर्यान्मध्ये मध्ये घृताहुतिम् ॥ ५५ ॥ कुर्यात्पूर्णाहुतिं चान्त्ये ग्रहस्तोत्रं तथा पठेत् ॥ त्रिःपरीत्य नमस्कारं महावाद्यसमन्वितम् ॥ ५६ ॥ तस्माद्भस्म समादाय पवित्रं पापनाशनम् ॥ धरेद्भालादिदेशेषु तिलकं कारयेद्बुधः ॥ ५७ ॥
अर्थ – अन्न, समिधा, लवंगा, उदक ह्या चार प्रकारच्याही होमांत प्रत्येक द्रव्याचा होम संपल्यावर अनींत तुपाची आहुति द्यावी. सर्व होम समाप्त झाल्यावर शेवटीं पूर्णाहुति ( तुपाची धार मध्ये न तुटेल अशा रीतीनें अनीत सारखी सोडणें ) द्यावी. ग्रहांचें स्तोत्र ह्मणावें. मग महावाद्यांचा घोष चालला असतां अग्नीला तीन प्रदक्षिणा कराव्यात. अग्नींतील भस्म पवित्र आणि पापनाशक असतें, ह्मणून तें घेऊन कपाळ वगैरे स्थानाला लावावें.
विशेषविधि.
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
For Private And Personal Use Only