________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
सोमसेनकृत वैवर्णिकाचार, अध्याय चत्रथा, पान १९०.
vener
अर्थ - आतां होमाच्या वटिका [ गोळया ] सांगतात- केशर, काळा चंदन, कापूर, गूळ, गुग्गुळ, पांढरा चंदन, फुलें, अक्षता, पाणी आणि लाह्या इतके पदार्थ मिसळून बेड्याच्या फळाएवढ्या वटिका है [ गोळ्या ] कराव्यात. आणि जयादि देवतांच्या मंत्राने अग्नीमध्यें होम करावा. मग ब्रह्म, माया वगैरे देवतांचा जलानें होम केल्यावर वटिकाहोम करावा. या ठिकाणीं जलानें जो होम करावयाचा, तो जलामध्येच करावयाचा, असें समजावें.
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
अन्न.
शाल्योदनं क्षीरविचित्रभक्ष्य । पक्कान्नसर्पिः श्रुतपायसं च ॥
सुस्वादु पक्कं कदलीफलं च । स्रुचाऽक्षमात्रं मिलितं जुहोमि ॥ ४३॥ अर्थ- होमाचें अन्न सांगतात- तांदळांचा भात, दूध, अनेकप्रकारचे भक्ष्य पदार्थ, शिजलेलीं अन्नं, तूप, दुधाचा खघा, पिकलेलें आणि मधुर असे केळ हे सर्व पदार्थ मिसळून बेहेड्याच्या फळायेवढे स्चीमध्ये घेऊन अनींत हवन करावें.
अन्नाभावे जुहुयात्तु तण्डुलानोषधीन् स्रुचा ॥
पयो दधि घृतं चापि शर्करां वा फलानि च ॥ ४४ ॥
अर्थ-- अन्न जर नसेल तर तांदूळ, वनस्पति, दूध, दही, तूप आणि साखर हे पदार्थ किंवा फलें
22NNR
For Private And Personal Use Only
A