________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सोमसेनकृत वार्णकाचार, अध्याय चवथा. पान १५५. greevwraswacecreenemaesveerencesservemences है अर्थ- श्रीजिनेंद्राचे दर्शन अत्यंत शुभकारक आहे, ते सर्व पातकांचा नाश करणारे व सर्व सद्गुणांचें। वसतिस्थान आहे. सज्जन लोक श्रीजिनेंद्राचे दर्शन हेच स्वर्गाचे मुख्यसाधन आहे असें ह्मणतात. मग मोक्षाचे साधन तरी ह्यापेक्षा निराळे कोणते असावयाचे आहे?
दर्शनं जिनरवेः प्रतापव-। चित्तपद्मपरमप्रकाशकम् ॥
दुष्कृतैकतिमिरापहं शुभं । विनवारिपरिशोषकं सदा ॥३३॥ अर्थ- श्रीजिनेंद्ररूपी जो सूर्य, त्याचे दर्शन प्रतापशाली असल्याने ते अंतःकरणरूपी कमलाचा विकास करणारे, पातकरूपी अंधकाराचा नाश करणारे, कल्याणप्रद आणि सर्वदा विघ्नरूपी उदक शोषून, टाकणारे असे आहे.
दर्शनं जिननिशापतेः परं । जन्मदाहशमनं प्रशस्यते ॥
पुण्यनिर्मलसुधाप्रवर्षणं । वर्धनं सुखपयोनिधेः सतः॥ ३४॥ अर्थ-- श्रीजिनपतिरूपी जो चंद्र त्याचे दर्शन जन्ममरणरूपी उकाड्याचा नाश करणारे आहे; आणि पुण्यरूपी स्वच्छ अमृताचा वर्षाव करणारे असून सत्पुरुषांच्या सुखरूपी समुद्राला भरती आणणारे आहे.2
दर्शनं जिनसुकल्पभूरुहः। कल्पितं हि मनसा प्रपूरयेत् ॥
सर्वलोकपरितापनाशनं । पम्फुलीति फलतो महीतले ।। ३५॥ Goviewweeeeeeeeeeeeeeeereverweacocreereeeeeeeeeeeeees
viewsveerencementer
For Private And Personal Use Only