________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
veerencesraaNAR
सोमसेनकृत वैवर्णिकाचार, अध्याय चवथा. पान १६... Precaceeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeee & अथे- ह्याप्रमाणे श्रीजिनेंद्राची स्तुति करून त्याच्या अग्रभागी बसावें. नंतर आपल्या पत्नीजवळ मागि-४
तलेले पाणी, अक्षता, गंध, फुलें, अनेक नैवेद्य, दीप, धूप आणि फल हे पदार्थ जीवजंतु त्यांत आहे की ६ काय! हे समजण्याकरितां नीट तपासून पाहून, शुद्धमनानें प्रभूची पूजा करावी.
आव्हानं स्थापनं कृत्वा सन्निधीकरणं तथा ॥
पञ्चोपचारविधितः पूजनं च विसर्जनम् ॥४५॥ 8 अर्थ- पूजा करतांना प्रथम श्रीजिनेंद्राचे आवाहन (बोलावणे) करावें. नंतर आपल्या पुढे असलेल्या प्रतिमेच्या ठिकाणी श्रीजिनेंद्राचे स्थापन करावें. मग सनिधीकरण (पूजा होईपर्यंत प्रतिमेच्या ठिकाणी रहाण्याची प्रार्थना) करावे. मग त्याची पंचोपचारानें पूजा करून विसर्जन करावें.
गर्भागारे जिनेन्द्राणां कृत्वा पूजां महोत्सवैः॥ स्तुतिं स्तुत्या परं भक्त्या नमस्कारं पुनःपुनः ॥ ४६॥ कृत्वा मण्डपमध्येऽत्र वेदिकां च समागमेत् ॥
जिनस्य दक्षिणे भागे दर्भासनमुपाश्रयेत् ॥ ४७॥ __ अर्थ- ह्याप्रमाणे गर्भागारांत श्रीजिनेंद्राची पूजा मोठ्या उत्साहाने करून, आणि अनेक स्तोत्रांनी त्याची स्तुति करून वारंवार नमस्कार करावेत. नंतर मंडपाच्या मध्यभागी असलेल्या कट्याजवळ यावे, आणि
aeeeeevNAVANAWAGAR
For Private And Personal Use Only