________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
eeroeneeeeeeeeeeaveMOUB
सोमसेनकृत वर्णिकाचार, अध्याय चवथा. पान १७२. है अर्थ- अंगावरील दोनी वस्त्रे, यज्ञोपवीत, कुंडले, मुकुट (शिरोभूषण) अंगठ्या, आणि हातांतील? है कडे ह्या सर्व वस्तु गंध लावून सुशोभित कराव्या.
ब्रह्मग्रन्थिसमायुक्तं दर्भेस्त्रिपञ्चभिः स्मृतम् ॥
मुष्ठ्यग्रं वलयं रम्यं पवित्रमिति धार्यते ॥ ८६ ॥ अर्थ-तीन अथवा पांच दर्भ घेऊन त्यांना ब्रह्मग्रंथि करून त्या ब्रह्मग्रंथीतून बाहेर आलेले दर्भाचे ? शेंडे चार अंगुले लांब सोडावेत, ह्याप्रमाणे केले असता त्या दर्भाची पुढे वलयामध्ये गांठ आणि खाली शेंडे अशी आकृति होते. ह्यास पवित्र असें ह्मणतात. हे पवित्र अनामिका ह्या बोटांत धारण करावे.
एवं जिनांधिगन्धैश्च सर्वांगं स्वस्य भूषयेत् ॥
इन्द्रोऽहमिति मत्वाऽत्र जिनपूजा विधीयते ॥ ८७॥ ___ अर्थ- याप्रमाणे जिनबिंबाच्या पायावरील गंधाने आपले सर्व अंग (ठिकठिकाणच्या अलंकारांच्या ऐवजी गंधलेपन करून ) भूषित करावें. आणि येथे मी इंद्र उभा आहे अशी भावना करून जिनपूजा करावी.
श्रीपीठस्थापन. पाण्डुकाख्यां शिलां मत्वा श्रीपीठं स्थापयक्रमात ॥ मध्ये श्रीकारमालेख्य दर्भाक्षतजलैः शुभैः॥८॥
evenvoceae
For Private And Personal Use Only