________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
feereemeneeeeeeee
सोमसेनकृत वैवर्णिकाचार, अध्याय चवथा. पान १८७. Parivateeteneraceaeeeeeeeeeeeeeeeeeeeee. किंवा त्या दोनी पात्रांबद्दल पिंपळाच्या पानांची योजना करावी.
ततः पलाशपत्रेण क्षीरक्षमारुहपत्रतः॥
क्वणोथवासु दद्यादादावाज्याहुतिं युधः॥३३॥ गोपुच्छसदृशा रुक् च स्रुवाग्रं नासिकासमम् ॥
दैर्घ्य द्वयोररत्निः स्यान्नाभिदण्डः षडङ्गुलः॥ ३४॥ अर्थ- अथवा वर सांगितलेले लाकूड मिळत नसल्यास पळसाच्या किंवा बडाच्या पानाची रुक आणि रुवा ही पात्रे तयार करावीत, त्या स्रुचीने किंवा स्रुव्याने तूपाची आहुती द्यावी. रुक नांवाचे पात्र गायीच्या शेपटीच्या आकाराचें-ह्मणजे लांबड तोंडाचें-करावें. आणि रुवा नांवाचे पात्र आपल्या नाकाच्या आकाराचें-रुंदट तोंडाचे-करावे. त्या पात्रांची तोंडे व मागील दांडा मिळून एक मुंडा हात लांबी असावी. त्यांत दांडा सहा वोटें लांब असावा. हे प्रमाण लाकडाची पात्रे करावयाची असल्यास समजावें.
तद्यं दर्भपूलेन प्रमृज्यासेचयेज्जलैः॥
काष्ठैः प्रताप्य तद्वन्दं ताभ्यां घृतं च होमयेत् ॥ ३५ ॥ ___ अर्थ- ती दोनी पात्रे होमाच्या वेळी दर्भपूलाने (दर्भाच्या जुडीने) मार्जित करून (पुसून) त्यांच्यावर उदक सिंचन करावे. आणि पात्रे अग्नीवर तापवून त्यांच्या योगानें अग्नीत घृतहोम करावा. Beawarenemencemesewaveeewweweveawaa
For Private And Personal Use Only