________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
सोमसेनकृत त्रैवर्णिकाचार, अध्याय चवथा. पान १५८.
wwwwwever
222
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
त्वन्मुखेन्दुदलिते तमस्तते । भूतलेऽत्र तकयोस्तु का स्तुतिः ॥ ४० ॥
अर्थ- हे प्रभो! अंधकाराने ( अज्ञानानें ) व्याप्त झालेले हे भूतल, जर तुझ्या मुखचंद्रानें प्रकाशमान (ज्ञानवान् ) होत आहे, तर रात्रीच्यावेळी चंद्राचे काय प्रयोजन आहे? आणि दिवसा सूर्याचें तरी काय प्रयोजन आहे ? कांहीं नाहीं. कारण, त्यांचे कांहीं कार्यच जगांत राहिलें नाहीं. ह्मणून, त्यांची स्तुति । करण्यांत कांहींच अर्थ नाहीं.
अमितगुणगणानां त्वद्वतानां प्रमाणं । भवति समधिगन्तुं यस्य कस्यापि वाञ्छा ॥
प्रथममपि सतायोम कत्यगुलं स्या । दित्ति च सततसंख्याभ्यासमङ्गीकरोतु ॥ ४१ ॥ अर्थ- हे नाथा ! तुझ्या ठिकाणी असलेल्या असंख्य गुणांचं प्रमाण समजावे अशी जर कोणाला इच्छा होईल; तर, त्यानें प्रथम आकाश किति अंगुर्ले लांब आहे तें मोजण्याकरितां संख्येचा अभ्यास करावा. तात्पर्य- आकाश किती अंगुले लांब आहे ह्याची संख्या समजणें जसें शक्य नाहीं, त्याप्रमाणें, तुझ्या गुणांची संख्या समजणेही शक्य नाहीं.
देव त्वदंधिनखमण्डलदर्पणेऽस्मि । नध्यें निसर्गरुचिरे चिरदृष्टवक्रः ॥
श्रीकीर्तिकान्तिधृतिसङ्गमकारणानि । भव्यो न कानि लभते शुभमङ्गलानि ॥ ४१ ॥ अर्थ- हे देवा! स्वभावतःच सुंदर असलेल्या आणि पूज्य अशा ह्या तुझ्या चरणनखरूपी दर्पणांत जो
For Private And Personal Use Only