________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
सोमसेनकृत त्रैवर्णिकाचार, अध्याय तिसरा. पान १३७.
अर्थ- पुढे आपल्या अंजलीत पाणी घेऊन "झं वं ” इत्यादि मंत्र ह्मणत आपल्या सभोवती प्रदक्षिणा करावी. आणि तें अंजलीतील उदक पूर्वदिशेकडे तोंड करून खाली सोडावें.
66
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
ततोऽपि मुकुलितकरकुड्मलः सन् “ ॐ नमोऽर्हते भगवते श्रीशान्तिनाथाय शान्तिकराय सर्वविघ्नप्रणाशनाय सर्वरोगापमृत्युविनाशनाय सर्वपरकृतक्षुद्रोपद्रवविनाशनाय मम सर्वशांतिर्भवतु ॥" इत्युच्चार्यअर्थ- मग हात जोडून “ ॐ नमोऽर्हते भगवते " इत्यादि मंत्र ह्मणावा. नंतर पूर्वेकडे तोंड करून पूर्वस्यां दिशि इन्द्रः प्रसीदतु " असें ह्मणावें, आग्नेयदिशेकडे तोंड करून “ आग्नेय्यां दिशि अग्निः प्रसीदतु " असें ह्मणावें. दक्षिणेकडे तोंड करून " दक्षिणस्यां दिशि यमः प्रसीदतु " असें ह्मणावें. नैर्ऋत्य दिशेकडे तोंड करून “ नैऋत्यां दिशि निऋतः प्रसीदतु " असें ह्मणावें. पश्चिमेकडे तोंड करून " पश्चिमस्यां दिशि वरुणः प्रसीदतु " असें ह्मणावें. वायव्यदिशेकडे तोंड करून " वायव्यां दिशि वायुः प्रसीदतु " असें ह्मणावें. उत्तरेकडे तोंड करून " उत्तरस्यां दिशि यक्षः प्रसीदतु " असें ह्मणावें. ईशान्य दिशेकडे तोंड करून "ईशान्यां दिशि ईशानः प्रसीदतु" असें ह्मणावें. खालीं तोंड करून "अधरस्यां दिशि धरणेन्द्रः प्रसीदतु " असें ह्मणावें. आणि वरती तोंड करून " ऊर्ध्वायां दिशि चन्द्रः प्रसीदतु " असें ह्मणावें. इति दशदिक्पालान्प्रसाद्य सन्ध्यावन्दनां निवर्तयेत् ॥
For Private And Personal Use Only