________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सोमसेनकृत वणिकाचार, अध्याय पहिला. पान ३९.
N
कृत ( स्वतः केलेली हिंसा) कारित ( दुसऱ्याकडून करवलेली हिंसा ) आणि अनुमोदित ( दुसऱ्यानें केली असतां मान्य केलेली हिंसा ) असे तीन भेद आहेत. ह्यामुळे हिंसेचे एकंदर सत्तावीस भेद झाले. आतां ह्या सत्तावीस प्रकारांपैकी प्रत्येकप्रकार जो घडतो त्याला कारण क्रोध, मान, माया आणि लोभ ह्या चार कपायांपैकी कोणतातरी एक कपाय असतोच. ह्मणून क्रोधामुळे होणारी हिंसा, मानामुळे होणारी हिंसा, मायेमुळे होणारी हिंसा आणि लोभामुळे होणारी हिंसा असे हिंसेचे चार प्रकार झाले. वर दाखविलेल्या सत्तावीस भेदांपैकी किंवा प्रकारांपैकी प्रत्येक प्रकार किंवा भेद चार प्रकारचा झाल्यानें हिंसेचे एकंदर एकशे आठ प्रकार होतात. ह्याप्रमाणेंच खोदें बोलणें, वगैरेंचेही प्रत्येकाचे एकशे आठ । प्रकार होतात. ते वाचकांनी थोडीशी सूक्ष्म बुद्धि करून विचार केला ह्मणजे सहज समजण्यासारखे आहेत. हे भेद तत्त्वार्थसूत्रांच्या सहाव्या अध्यायांतील आठव्या सूत्रांत सविस्तर सांगितले आहेत. आतां हिंसेचे जे एकशे आठ प्रकार वर सांगितले; त्यांचीच दुसरी एक तन्हा सांगतातपृथ्वीपानीयतेजः पवनसुतरथः स्थावराः पञ्चकायाः ॥
नित्यानित्यौ निगोदौ युगल शित्रिचतुः सञ्ज्ञ्य सञ्ज्ञितसाः स्युः । एते प्रोक्ता जिनैर्द्वादश परिगुणिता वाङ्मनः कायभेदै । स्ते चान्यैः कारिताद्यैस्त्रिभिरपि गुणिताश्चाष्टशून्यैकसंख्याः ॥ ८९ ॥
YAVAVG
For Private And Personal Use Only