________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
सोमसेनकृत लैवर्णिकाचार, अध्याय तिसरा.
NNNNeve
त्याला लागणाऱ्या कालांत सत्तावीस वेळां श्वास वरतीं ओढावा. ह्मणजे वरीलप्रमाणे थांबून पंचनमस्कारमंत्राच्या चार आवृत्ति झाल्या ह्मणजे श्वास वर ओढून घ्यावा. ह्याप्रमाणें प्रत्येक चार चार जप झाल्यावर श्वास वरती ओढावा. अशा रीतीनें जप केला असतां सर्व पातकांचा नाश होतो. वाचिकाख्य उपांशुश्च मानसस्त्रिविधः स्मृतः ॥
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
पान १२४.
vwwvvvvvvvvvvvvvvv~~~S
त्रयाणां जपमालानां स्याच्छ्रेष्ठो ह्युत्तरोत्तरः ॥ ११५ ॥
अर्थ -- वाचिक, उपांशु आणि मानस असे जपाचे तीन प्रकार आहेत. त्या तीहींत पुढला पुढला जप श्रेष्ठ समजावा. ह्मणजे वाचिकजपापेक्षां उपांशुजय श्रेष्ठ, आणि उपांशुजपापेक्षां मानसजप श्रेष्ठ असें समजावें. यदुच्चनीचस्वरितैः शब्दैः स्पष्टपदाक्षरैः ॥
मन्त्रमुच्चारयेद्राचा जपो ज्ञेयः स वाचिकः ॥ ११६ ॥
अर्थ — उच्च, नीच आणि स्वरित ह्या स्वरांनी युक्त असलेल्या शब्दांचा व अक्षरांचा स्पष्ट उच्चार करून मंत्र ह्मणर्णे हा वाचिकजप जाणावा. ( उच्च ह्मणजे उंच स्वर, नीच ह्मणजे खालचा स्वर, आणि स्वरित ह्मणजे उच्च आणि नीच ह्या दोहोंच्या मिश्रणानें झालेला स्वर असें समजावें. )
शनैरुच्चारयेन्मन्त्रं मन्दमोष्ठौ प्रचालयेत् ॥
अपरैरथुतः किञ्चित्स उपांशुर्जपः स्मृतः ॥ ११७ ॥
For Private And Personal Use Only