________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
ए
Ve20000000७४vels
सोमसेनकृत त्रैवर्णिकाचार, अध्याय तिसरा. पान १२२. eveerencememesecrecovervaveersinesammercaeeeeees R अर्थ-देवांना जी पाण्याची अंजली द्यावयाची ती सहा वेळां अथवा तीन वेळा द्यावी. ज्या पाण्याने ही क्रिया करावयाची ते पाणी नदीतून एका भांड्यांत निराळे घेतलेले असावे. मग जप करण्या-१ करितां दर्भासनावर किंवा दुसऱ्या कसल्यातरी आसनावर बसावें. त्यांत, वेळूच्या आसनावर जपास बसले असतां दारिद्य येते. दगडावर बसले असतां रोगांची पीडा होते. भूमीवर बसले असतां दुःख । प्राप्त होते. लाकडाच्या आसनावर बसले असतां दुर्भाग्य प्राप्त होते. गवताच्या आसनावर बसले असतां कीर्तीचा नाश होतो. झाडाच्या पानांच्या आसनावर बसलें असतां मनाला भ्रांति पडते. हरणाच्या किंवा दुसऱ्या कातड्यावर बसले असतां ज्ञानाचा नाश होतो. कावळ्यावर किंवा दुसऱ्या कोणत्याही लोकरीच्या, आसनावर बसलें असतां पापाची वृद्धि होते. काळ्या वस्त्रावर बसले असतां फार दुःख होते. हिरव्या रंगाच्या वस्त्रावर बसले असतां मानभंग होतो. पांढऱ्या वस्त्रावर यशाची वृद्धि होते. पिवळ्या वस्त्रावर वसले असतां सुखाची वृद्धि होते. तांबडे वस्त्र प्राणायामाला फारच उत्तम मानिले आहे. आणि सर्व धार्मिक क्रियेची सिद्धि होण्यास दर्भाचे आसन श्रेष्ठ आहे असे समजावें.
जप करण्याचा विधि. समं ध्याने मनः कृत्वा मध्यदेशेषु निश्चलम् ॥
ज्ञानमुद्राङ्कितो भूत्वा स्वाके तु वामहस्तकम् ॥ १११॥ weeasoivecoceaenerawaseenesameocomewwwcaseenak
For Private And Personal Use Only