________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
सोमसेनकृत त्रैवर्णिकाचार, अध्याय तिसरा.
पान ९८.
न कुर्यात्पितृकर्माणि दानहोमजपादिकम् ॥ खण्डवस्त्रावृतश्चैव वस्त्रार्धप्रावतस्तथा ॥ ३७ ॥
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
- अर्थ - एक वस्त्र नेसून अंगावर दुसरें वस्त्र जर घेतलेले नसेल तर त्या एक वस्त्रावर भोजन करूं नये, देवपूजा करूं नये, पितृक्रिया करूं नये, दान, जप आणि होम ह्या क्रियाही करूं नयेत. तसेंच एक फाडून त्याची दोन वस्त्रें केलीं असल्यास तसल्या वस्त्रावर (तीं वस्त्रे नेसून व पांघरून ) कोणतीही वरील क्रिया करूं नये. त्याप्रमाणेच अर्धे वस्त्र नेसून आणि अर्धे वस्त्र पांघरून देखील वरील क्रिया करूं नयेत. कारण शास्त्रांत असें सांगितले आहे कीं
उक्तंच-- स्नानं दानं जपं होमं स्वाध्यायं पितृतर्पणम् ॥
नैकवस्त्रो गृही कुर्याच्छ्राध्द भोजनसत्क्रियाम् ॥ ३९ ॥
अर्थ – गृहस्थानें एक वस्त्र धारण करून, स्नान, दान, जप, होम, स्वाध्याय, पितृतर्पण, श्राद्ध आणि भोजन ह्या क्रिया करूं नयेत. धार्यमुत्तरीयमादौ ततोऽन्तरीयकं तथा ॥ चतुष्कोणं भवेद्वस्त्रमन्तरीयं च निर्मलम् ॥ ४० ॥ अर्थ - पांघरावयाचें वस्त्र प्रथम धारण करावें; नंतर नेसावयाचें वस्त्र नेसावें. नेसावयाच्या व पांचरावयाच्या ह्या दोनी वस्त्रांचे चारी कोपरे शाबूद असावेत, फाटलेले नसावेत. आणि वस्त्र स्वच्छ असावें.
~~
१७
For Private And Personal Use Only