________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
सोमसेनकृत त्रैवर्णिकाचार, अध्याय तिसरा. पान ११५.
wawa www
स्नाने दाने जपे यज्ञे स्वाध्याये नित्यकर्मणि ॥ सपवित्रौ सदर्भों वा करौ कुर्वीत नान्यथा ॥ ९५ ॥
अर्थ- स्नान, दान, जप, यज्ञ, स्वाध्याय आणि नित्यकर्म ह्या कर्मात पवित्र किंवा दर्भ ह्यांनी युक्त हात असावेत. इतर वेळीं पवित्र किंवा दर्भ हातांत धारण करूं नयेत.
करयुग्मस्थितैर्दर्भैः समाचामति यो गृही ॥
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
महत्पुण्यफलं तस्य भुक्ते चतुर्गुणं भवेत् ॥ ९६ ॥
अर्ध- दोन्ही हातांत दर्भ धारण करून जो गृहस्थ श्रावक आचमन करतो, त्याचें पुण्यफल फार मोठें आहे. आणि पवित्र धारण करून भोजन करील तर तें पुण्य चौपट अधिक होईल.
दर्भ विना न कुर्वीत चाचमं जिनपूजनम् ॥ जिनयज्ञे जपे होमे ब्रह्मग्रन्थिर्विधीयते ॥ ९७ ॥
अर्थ - दर्भ धारण केल्यावांचून आचमन, जिनपूजन वगैरे क्रिया करूं नयेत. जिनपूजन जप आणि होम ह्या कर्मात पवित्राला ब्रह्मग्रंथि (ब्रह्मगांठ ) असावी.
पवित्रः सदर्भों वा कर्माङ्गाचमनं चरेत् ॥
नोच्छिष्टं तत्पवित्रं तु भुक्त्वोच्छिष्टं तु वर्जयेत् ॥ ९८ ॥
NOREN
For Private And Personal Use Only