________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सोमसेनकृत त्रैवर्णिकाचार, अध्याय तिसरा. पान ११९.
De ANN
क्ष्व इत्येकवारं मुखं एवं तर्जन्यंगुष्ठाभ्यां दक्षिणं वामं च नासाविवरं वं मं ॥ अंगुष्ठानामिकाभ्यां चक्षुषी हं सं ॥ कनीयस्यंगुष्ठयुग्मेन श्रोत्रयुग्मं तं पं ॥ अंगुष्ठेन नाभिं द्रां । तलेन हृदयं ह्रीं ॥ हस्ताग्रेण भुजशिखरयुगं हं सः ॥ समस्तहस्तकेन मस्तकं स्पृशेदेकवारमेव स्वाहा इति ॥ श्रोत्राचमनविधिः क्रियाभेदात्पञ्चदशधा । अङ्गभेदात्पुनर्द्वादशधा ||
अर्थ - नंतर “क्ष्वीं" ह्या मंत्राने एकवार मुखाला स्पर्श करावा. " वं मं" ह्या मंत्राने अंगठा आणि त्याच्या जवळचें वोट ह्या दोहोंनीं नाकाच्या छिद्रांस स्पर्श करावा. अंगठा आणि अनामिका ह्या दोन बोटांनी "हं सं" ह्या मंत्रानें दोनी डोळ्यांस स्पर्श करावा. शेवटचें बोट आणि अंगठा ह्या दोन बोटांनी “ तं पं " ह्या मंत्रानें दोनी कानांस स्पर्श करावा. " द्रां " ह्या मंत्रानें नुसत्या अंगठ्यानें नाभीला स्पर्श करावा. " द्री" ह्या मंत्रानें तळहतानें उराला स्पर्श करावा. “हं सः " ह्या मंत्राने सर्व बोटांच्या शेवटानें दोनी बाहुट्यांस स्पर्श करावा. आणि “स्वाहा " ह्या मंत्राने सर्व हातानें मस्तकाला एकवार स्पर्श करावा. ह्याप्रमाणे हा श्रोत्राचमनाचा विधि सांगितला. ह्या विधींत पंधरा क्रिया आहेत, आणि स्पर्श करण्याचीं अंगे बारा आहेत. हा वरील विधि करतांना त्या त्या बोटास वगैरे पाणी लावून त्या त्या अंगाला स्पर्श करावा. ततोsनामिकायां दर्भ निधायानामिकाङ्गुष्ठाभ्यां नासाग्रं गृहीत्वा ।
For Private And Personal Use Only