________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
rese
2x3
सोमसेनकृत वैचणिकाचार, अध्याय तिसरा. आणिलें असतां समजेल. ] आणि मग त्या वस्त्रानें कंबरेला वेष्टन करावें. [ ह्या वेळी उजव्या हातांतील ? पदर डाव्या हातांत आणि डाव्या हातांतील पदर उजव्या हावांत येत असतो. ] नंतर डावीकडील बगलेला वस्त्राचें बंधन करावें ह्मणजे डाव्या कुशीजवळ वस्त्र खोवावें.
कोणइयं ततः पश्चात्समीचीनं प्रकच्छयेत् ॥ कटीमेखलिकामन्तर्देशे गोप्यां प्रबन्धयेत् ॥ ४५ ॥
अर्थ- मग एका पदराचे दोन कोपरे घेऊन पाठीकडल्या बगलेला कासोटा बांधावा. कंबरेची मेखला ( करदोडा ) वस्त्राच्या आंत गुप्त असावी. बाहेर दिसूं नये. आजानुकं तथाऽऽजङ्कं चानलीकं गृहोत्तमैः ॥ धारयेदुत्तरीयं तु यथादेहं पिधापयेत् ॥ ४६ ॥
अर्थ - नेसलेलें वस्त्र गुडघ्यापर्यंत किंवा पिंडरीपर्यंत अथवा घोट्यापर्यंत नेसावें आणि पांघरावयाचें वस्त्र शरीराच्या अदमासानें पांघरावं.
आजानुकं क्षत्रियाणामाजङ्कं वैश्यसम्मतम् ॥ आघौण्टं ब्रह्मपुत्राणां शूद्राणां शूद्रवन्मतम् ॥ ४७ ॥
अर्थ -- क्षत्रियांचें नेसावयाचें वस्त्र गुडघ्यापर्यंत असावें. वैश्यांचें पिंडरीपर्यंत असावें. ब्राह्मणांचे वस्त्र घोट्यापर्यंत असावें. आणि शूद्रांचें वस्त्र त्यांच्या चालीप्रमाणें असावें. नोत्तरीयमधः कुर्यान्नोपर्यधस्स्थमम्बरम् ॥ अज्ञानाद्यदि कुर्वीत पुनः लानेन शुध्यति ॥ ४८ ॥ अर्थ- पांघरण्याचे वस्त्र नेसूं नये आणि नेसावयाचें पाघरू नये. गैर समजुतीनें जर अशी उलटा
For Private And Personal Use Only
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
पान १००.