________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
HOBRUWA0003ereemerMag
सोमसेनकृत वर्णिकाचार, अध्याय तिसरा. पान १०५. B eneomeeroenomeneaoneeeeeeeeeeeeeeeeeeeeees 6 अर्थ-स्नान केल्यावर अथवा स्नान न केले असताही शुद्ध जाग्यावर बसून आचमन अवश्य करावें.. कारण, आचमन केल्याने मनुष्य शुद्ध होतो.
देशं कालं वयो वंशं गोत्रं जातिं गुरुं तथा ।।
संस्मृत्य प्राहसन्ध्यायां सङ्कल्प्याचमनं चरेत ॥ ६१ ॥ अर्थ---प्रातःकाली आपल्या रहाण्याचा देश, सध्या असलेला काल, आपला वंश, आपले गोत्र, आपली जाति आणि आपला गुरु इतक्यांचे स्मरण करून संकल्प करून आचमन करावें.
पूर्ववद्वस्त्रमादाय कुर्यादाचमनं बुधः॥
न तिष्ठन्न स्थितो नम्रो नामन्त्रो नास्पृशन् जलम् ॥ ६२॥ अर्थ- स्नान केल्यावर पूर्वी सांगितल्याप्रमाणे वस्त्र धारण करून आचमन करावें. ते उभे राहून करूं नये, वांकून करूं नये, मंत्रावांचून करूं नये आणि जलस्पर्श केल्यावांचून करूं नये.
सव्यहस्तेन (2) त्र्यगुल्या शखीकृत्य पिबेत्पयः॥
माषमात्रं प्रमाणं स्याज्जलमाचमने शुभम् ॥ ६३ ॥ अर्थ- उजव्या हाताने तीन बोटांनी शंखमुद्रा करून जलप्राशन करावें. आचमनाचे पाणी उडीदभर असावे, हे त्याचे मुख्य प्रमाण आहे. vocaceencaenewa0000eneverseasomarvasarovin
PanverURVASHAVA
For Private And Personal Use Only