________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
सोमसेनकृत त्रैवर्णिकाचार, अध्याय पहिला. पान ३७.
exererereYNNYvvvv
ॐ नमः सिद्धमित्येतन्मन्त्रं सर्वसुखप्रदम् ॥ जपतां फलतीष्टं स्वयं स्वगुणजृम्भितम् ॥८२॥ अर्थ — ' ओं नमः सिद्धं ' हा मंत्र सर्वप्रकारचें सुख देणारा आहे. ह्याचा जप करणारांचे सर्व मनोरथ सिद्ध होतात. आणि आत्म्याचे जे स्वाभाविक गुण आहेत ते आपोआप प्रकाशमान होतात. ह्याला पंचाक्षरी मंत्र ह्मणतात. " णमो अरिहंताणं " हा सप्ताक्षरी मंत्र होय. " अरिहंतसिद्धं नमः ह्यास अष्टाक्षरी मंत्र ह्मणतात. " अरिहंत सिद्धसाधुभ्यो नमः " ह्याला एकादशाक्षरी मंत्र ह्मणतात. “ अरिहंतसिद्धसर्वसाधुभ्यो नमः" ह्याला त्रयोदशाक्षरी मंत्र ह्मणतात. आणि "ओं -हाँ ही हूँ है है हो हो हः असि आउ सा सम्यग्दर्शनज्ञानचारित्रेभ्यो नमः " ह्याला सप्तविंशत्यक्षरी मंत्र ह्मणतात.
इत्थं मन्त्रं स्मरति सुगुणं यो नरः सर्वकालं । पापारिघ्नं सुगतिसुखदं सर्वकल्याणबीजम् ॥ मार्गे दुर्गे जलगिरिगहने सङ्कटे दुर्घटे वा ।
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सिंहव्याघ्रादिजाते भवभयकदते रक्षकं प्राणभाजाम् ॥ ८३ ॥
अर्थ — ह्याप्रमाणें हा वर सांगितलेला मंत्र पापरूपी शत्रूचा नाश करणारा आहे. सद्गति आणि सुख ह्यांना देणारा व सर्वकल्याणाची प्राप्ति करून देणारा आहे. ह्या मंत्राचें जो कोणी मनुष्य सर्वदा स्मरण करतो, त्याचें- भयंकर मार्गात, पाण्यांत, पर्वतावर, अरण्यांत, संकटांत, विघडलेल्या कामांत, तो मंत्र रक्षण
For Private And Personal Use Only