________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सोमसेनकृत त्रैवर्णिकाचार, अध्याय पहिला. पान ३६. Yetencoveriencememomentenceencaeneeeeeeeeeeeg
चवदा हजार जप करतो, तो विषयासक्त जरी असला तथापि वीतराग होतो. १ पञ्चत्रिंशद्भिरेवात्र वर्णश्च परमेष्ठिनाम् ॥ मन्त्रः प्राकृतरूपैश्च न कस्यापि कृतो व्ययः ॥ ७८ ॥ १ स्मर्तव्यः सानुरागेण विषयेष्वपरागिणा ॥ वीरनाथप्रसादेन धर्म विद्धता परम् ॥ ७९ ॥ ६ अपराजितमंत्रोऽयं सर्वविघ्नविनाशनम् ॥ मङ्गलेषु च सर्वेषु प्रथमं मङ्गलं मतः ॥ ८॥
अर्थ- “णमो अरिहंताणं । णमो सिद्धाणं । णमो आइरियाणं । णमो उवज्झायाणं । णमो लोए सव्य-र साहूणं । " हा पस्तीस अक्षरांनी युक्त असलेला परमेष्ठीचा मंत्र आहे. हा प्राकृतभाषेतील मंत्र आहे. ह्याच्या योगानं कोणाचाही नाश झालेला नाही. ह्मणजे ह्या मंत्राचा जप करणारा कोणताही जीव अधोगतीस गेलेला नाही. ह्मणून सरागांनी व वीतरागांनी दोघांनीही ह्या मंत्राचे चिंतन अवश्य करावें; आणि श्रीवीरनाथाच्या कृपेनें धर्मसंचय करावा. ह्या मंत्रास 'अपराजितमंत्र' असें नांव आहे. हा मंत्र सर्वविघ्नांचा नाश करणारा असल्यामुळे मंगलकृत्यांत प्रथम मंगल समजून ह्याचा उपयोग करावा. स्मर मन्त्रपदोदभूतां महाविद्यां जगत्सुताम् ।। गुरुपञ्चकनामोत्यां षोडशाक्षरराजिताम् ॥८१॥
अर्थ-पंचगुरूंच्या नांवापासून उत्पन्न झालेली व मंत्ररूप असलेल्या अशा शब्दापासून तयार झालेली। " अर्हत्सिद्धाचार्योपाध्यायसर्वसाधुभ्यो नमः" ही सोळा अक्षरांनी सुशोभित दिसणारी जी महाविद्या (महा-8 मंत्र) त्याचें तूं स्मरण कर!
For Private And Personal Use Only